गेली १६ वर्ष ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत खळखळून हसवत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर अजूनही प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. मालिकेतील कलाकारांना त्यांच्या भूमिकांमुळे नवी ओळख मिळाली आहे. त्यापैकी एक म्हणजे आत्माराम तुकाराम भिडे अर्थात मंदार चांदवडकर. जेठालाल, तारक मेहता यांच्याप्रमाणेच भिडे मास्तर यांचाही एक वेगळा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
अभिनेता मंदार चांदवडकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मंदार चांदवडकर पेरुच्या शेतात गेलेले पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ते मंदार म्हणतायत, “नमस्कार मंडळी, पेरु देशात जाईन तेव्हा जाईन. पण, आपल्या देशातल्या पेरुच्या बागेत मी आलो आहे. माझ्या मागे पाहू शकता, पेरुची कलमं लावलेली आहेत. खूप छान वाटतंय. बघा शेतकरी राजाकडून किती काळजी घेतली जातेय