घरात लावा फक्त ही एक वनस्पती, साप घरातच काय परिसरात सुद्धा फिरकणार नाही November 18, 2024 by akshay1137 घरात लावा फक्त ही एक वनस्पती, साप घरातच काय परिसरात सुद्धा फिरकणार नाही सापांबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात समाजामध्ये अज्ञान आहे, विशेष म्हणजे साप चावल्यानंतर लगेचच माणूस मरतो हा एक मोठा गौरसमज आहे. फक्त ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला आहे, त्या व्यक्तीला वेळेत उपचार मिळणे आवश्यक असते, तर त्याचा जीव वाचू शकतो सापाबाबत आणखी एक गैरसमज म्हणजे प्रत्येक साप हा विषारीच असतो असा असलेला समज, मात्र आपल्या सभोवती आढळणाऱ्या सापांच्या जातींपैकी जवळपास नव्वद टक्के साप हे बिनविषारी असतात, ते चावल्यामुळे व्यक्ती दगावत नाही.त्यामुळे दिसला साप की मारला असं न करता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी. साप आपल्या घरात येऊ नये म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं असतं त्यामध्ये आपलं घर आणि परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवावा, घरात आडागळीच्या जागा नसाव्यात. घरात पुरेसा सुर्य प्रकाश येण्याची व्यवस्था असावी.