SUV Under 20 Lakh: गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये या एसयूव्हीवर 1 लाख 60 हजारांपर्यंत सूट मिळत होती पण आता ही सूट जवळपास दुप्पट झाली आहे. महिंद्राची फाईव्ह डोअर Thar Roxx आल्यानंतर थ्री डोअर Mahindra Thar चा पहिला वेटिंग पीरियड कमी करण्यात आला आणि आता या एसयूव्हीवर 3 लाखांपर्यंत दमदार डिस्काउंट दिला जात आहे.
SUV Under 20 Lakh: थार घ्या हो, थार घ्या! कारण, आता एसयूव्हीवर 3 लाखांपर्यंत दमदार डिस्काउंट दिला जात आहे. महिंद्राची फाईव्ह डोअर Thar Roxx आल्यानंतर थ्री डोअर Mahindra Thar चा पहिला वेटिंग पीरियड कमी करण्यात आला आणि आता या एसयूव्हीवर 3 लाखांपर्यंत दमदार डिस्काउंट दिला जात आहे. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये या एसयूव्हीवर 1 लाख 60 हजारांपर्यंत सूट मिळत होती पण आता ही सूट जवळपास दुप्पट झाली आहे.
महिंद्रा थार 4×4 आणि 4×2 ऑप्शनमध्ये उपलब्ध
रिपोर्ट्सनुसार, डिस्काऊंट डीलरशिपच्या स्टॉकवर अवलंबून आहे. याशिवाय स्पेशल एडिशन मॉडेल Thar Earth Edition थारवर सर्वाधिक सूट दिली जात आहे. Mahindra Tha 4×4 आणि 4×2 ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. या एसयूव्हीमध्ये 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 150 बीएचपीपॉवर जनरेट करते.