हिवाळ्यात लोकांना जास्त एकटेपणा आणि उदास का वाटते? ‘हे’ आहे उत्तर
सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर हा नैराश्याचा एक प्रकार आहे. हा प्रकार सहसा हिवाळ्यात होण्याची शक्यता जास्त असते. कारण हिवाळ्यात दिवस कमी असल्याने वातावरणात बदल घडून येतात त्यामुळे लोकांना उदास वाटू लागते.
- उदास वाटण्याची काही सामान्य लक्षणे
- उदास वाटणे
- कमी उर्जा पातळी मिळणे
- जास्त किंवा कमी झोप येणे
- आहारात बदल होणे
- वजन वाढणे
- चिडचिडेपणा
- लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे
- सामाजिक संबंधांमध्ये रस कमी होणे
- एकटेपणा नाहीसा करणयाचे उपाय
लाइट थेरपीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा प्रकाश वापरला जातो, जो सूर्यप्रकाशासारखाच असतो. हे सेरोटोनिनचे उत्पादन वाढविण्यास मदत करते.
नियमित व्यायाम केल्याने आपला मूड सुधारू शकतो आणि उर्जेची पातळी वाढू शकते.
हेल्दी फूड खाल्ल्याने तुमचे शरीर निरोगी राहील आणि तुमचा मूडही चांगला होईल.
सामाजिक कार्यात सहभागी होऊन मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा.
सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळते. व्हिटॅमिन-डीची कमतरता हिवाळ्यात उद्भवू शकते, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्हिटॅमिन-डी पूरक आहार घेऊ शकता.
योगा आणि मेडिटेशनमुळे तणाव कमी होतो आणि मन शांत होते.
जर तुम्ही खूप उदास असाल तर थेरपिस्टचा सल्ला घ्या.