Shocking video: कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच या वाघानं अशी हिम्मत केलीय जी पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
Viral video: जंगलाचा राजा वाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघच्या नादाला कुणी लागत नाही. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच या वाघानं अशी हिम्मत केलीय जी पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं…
सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे वेगवेगळे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. वाघाची डरकाळी ऐकून चांगल्या लोकांना घाम फुटतो. जंगालात भयानक शिकारी वाघ याचाही चांगलाच दरारा असतो. त्यामुळे वाघ आणि सिंह दोघेही खूप बलवान आणि हुशार प्राणी आहेत. त्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. वाघ आणि सिंहाच्या हल्ल्यात वाचणं कठिण असतं त्यामुळे या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात आणि प्राण्यांच्याही मनात भिती असते. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वाघाने चित्तथरारक अशी उडी घेतली आहे. या व्हिडीओत वाघाने दहा फूट उंच उडी मारल्याचं स्पष्ट दिसतंय, व्हिडीओ स्लो मोशनमध्ये असल्याने वाघाने मारलेली उडी ही चित्तथरारक आहे.
Tiger effortlessly jumps across the river with a single leap pic.twitter.com/Q0cu9MT7a1
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) November 3, 2024