उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा Crop insurance 2024
Crop insurance 2024 : उद्यापासून म्हणजेच 12 ऑक्टोंबरपासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून अहमदनगर जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 2023 सालची थकीत पीकविमा नुकसानभरपाई खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. अशी माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्ष कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.
लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
👉 इथे क्लिक करा 👈
तर उर्वरित नाशिक, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, जळगाव या जिल्ह्यातही लवकरच वाटप सुरू होणार असल्याची माहिती आहे. खरीप २०२३ हंगामात (Kharif Season) राज्यात एकूण साधारण ७६२१ कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती. पिक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते म्हणजेच ज्या ठिकाणी पिक विमा (Pik Vima Yojana) हप्त्याच्या 110 टक्के पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी 110 टक्के पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते. या तत्त्वानुसार खरीप 2023 हंगामातील मंजूर ७६२१ कोटी पैकी विमा कंपनी मार्फत रुपये ५४६९ कोटी शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली होती.
लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
👉 इथे क्लिक करा 👈
तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी पैकी रु.१९२७ कोटी ची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होते. सर्वात जास्त पीकविमा नुकसानभरपाई एकट्या नगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून घेणे होते. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारत पक्षाकडून दि. 30 सप्टेंबर रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान त्याच 30 सप्टेंबरचे रात्री 11:30 वाजता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्रातील अहमदनगरसह 6 जिल्ह्यांचा प्रलंबित असलेल्या सुमारे १९२७.५२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा GR निघाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे Crop insurance 2024.